'हा' एक इन्शुरन्स काढा, अन् गृहकर्जाची चिंता सोडा, तुमच्या कुटुंबाला EMI भरण्याची गरज पडणार नाही!

होम लोन इन्शुरन्स हा होम लोन प्रोटेक्शन प्लॅन आहे. प्रत्येक बँकेतर्फे हा इन्शुरन्स दिला जातो. या इन्शुरन्सचे अनेक फायदे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
होम लोन घेणाऱ्या व्यक्तीचे अकस्मात निधन झाल्यास होम लोन इन्शुरन्सची मदत होते. म्हणजेच लोन घेणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्यास होम लोन इन्शुरन्स प्लॅनच्या अंतर्गत घराचे कर्ज फेडले जाते.

होम लोन इन्शुरन्स असेल तर लोन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना घराचे कर्ज फेडण्याची गरज नसते. होम लोन इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत हा इन्शुरन्स ऑफर करणारी संस्था, कंपनीच घराचे कर्ज फेडते.
होम लोन इन्शुरन्स काढल्यामुळे लोन देणारी बँक कर्जदाराच्या मृत्यूनंतर घरावर हक्क सांगू शकत नाही.
होम लोन इन्शुरन्स हा अनिवार्य नसला तरी गरजेचा आहे. कोणतीही बँक, आरबीआय किंवा अन्य संस्था तुम्हाला हा विमा अनिवार्य करत नाही. पण तो काढल्यास भविष्यातील अनिश्चिततेपासून सुरक्षा मिळते.
होम लोन इन्शुरन्स हा एकूण गृहकर्जाच्या दोन किंवा तीन टक्के असतो. गृहकर्ज घेताना या इन्शुरन्सची रक्कम एकहाती देता येते. किंवा इएमआयच्या माध्यमातूनही होम लोन इन्शुरन्स घेता येतो.
गृहकर्ज कोणाच्या नावे वर्ग केल्यास होम लोन इन्शुरन्सचा फायदा होत नाही.
अशा स्थितीत हा विमा लागू होत नाही. मात्र तुम्ही तुमचे गृहकर्ज ट्रान्सफर, प्री-पेमेंट, रिस्ट्रक्चर करण्याचा निर्णय घेतल्यास, होम लोन इन्शुरन्स कायम राहतो.
image 9
image 10