US Market Fall : अमेरिकेच्या शेअर बाजारात भूकंप, ट्रम्प यांच्या एका वक्तव्यानं खळबळ, एसअँडपी अन् नॅस्डॅक कोसळले
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यावर हल्ले सुरु केले आहेत. केंद्रीय बँकांच्या स्वायत्ततेवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. याशिवाय जागतिक व्यापारासंदर्भातील प्रगती कमी दिसत असल्यानं अमेरिकन शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक गडगडले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्यावरील हल्लाबोल सुरु ठेवल्यानं आणि जागतिक बाजारातील अस्थिरता किंवा अनिश्चितता कमी होण्याचे संकेत मिळत नसल्यानं डाऊ जोन्स इंडस्ट्रीअल अवरेज 925 अंकांनी म्हणजेच 2.4 टक्क्यांनी घसरला.
एस अँड पी 500 निर्देशांक 2.4 टक्के, नॅस्डॅक 2.7 टक्के घसरला. अमेरिकन डॉलर इंडेक्स घसरुन 97.92 वर आला आहे. मार्च 2022 नंतर निचांकी पातळीवर पोहोचला आहे. सोन्याची चमक वाढत असून ते 3400 डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत.
एपल, मायक्रोसॉफ्ट, एनवीडिया, अमेझॉन, अल्फाबेट, मेटा आणि टेस्ला या कंपन्यांचे शेअर गडगडले आहेत. एलन मस्क यांच्या टेस्लाचे शेअर 7 टक्के घसरले आहेत. तर, एनवीडियाचे शेअर 5 टक्क्यांनी घसरले. अमेझॉन 4 आणि मेटा 3 टक्क्यांनी घसरले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रथ सोशलवर पोस्ट करत अमेरिकन फेड व्याज दरात कपात करत नसल्याचं म्हटलं. जेरोम पॉवेल यांना टारगेट करत मिस्टर टू लेट अ मेजर लूजर असं म्हटलं युरोपमध्ये 7 वेळा व्याज दरात कपात होते. हा उल्लेख देखील ट्रम्प यांनी केला. जेरोम पॉवेल नेहमी उशीर करतात अशी टीका देखील ट्रम्प यांनी केली. याशिवाय ट्रम्प यांनी पॉवेल यांनी बायडन आणि कमला हॅरिसच्या काळात व्याज कपात करुन मदत केल्याचा आरोप देखील केला. दरम्यान, जेरोम पॉवेल यांना फेडमधून काढण्याबाबत विचार सुरु असल्याची बाब समोर आली आहे.