ऑक्टोबरनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या 'या' कंपन्यांनी दिला बंपर नफा
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात IPOची भाऊगर्दी दिसली. त्यातील काही कंपन्यांनी गुंतवणुकदारांना बंपर नफा दिला तर काहींनी चिंता वाढवल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑक्टोबरनंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या या कंपन्यांनी गुंतवणुकदारांना बंपर नफा दिला. जाणून घेऊयात या कंपन्यानी गुंतवणुकदारांना किती नफा दिला.
पारस डिफेन्सने आयपीओमध्ये प्रति शेअर 175 इतकी किंमत निश्चित केली होती. सध्या या शेअरची किंमत 727 रुपये इतकी सुरू आहे. जवळपास 315 टक्के परतावा दिला आहे.
लेटेंट व्ह्यू अॅनालिटिक्सची आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 197 इतकी होती. या शेअरने 217 टक्के परतावा दिला असून सध्या याची किंमत 625 रुपये इतकी आहे.
सिगाची इंडस्ट्रीने आयपीओमध्ये प्रति शेअर 163 रुपये इतकी किंमत निश्चित केली होती. सध्या याची किंमत 431 रुपये इतकी आहे. जवळपास 164 टक्के परतावा दिला आहे.
नायकाने आयपीओमध्ये प्रति शेअर 1125 इतकी किंमत दिली होती. या शेअरने 86 टक्के परतावा दिला असून 2092 इतकी सध्या किंमत आहे.
टेगा इंडस्ट्री आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 453 इतकी होती. बाजारात 68 टक्के प्रीमियमने 753 रुपयांवर सूचीबद्ध झाला.