Stock Market : शेअर बाजारात 3 रुपयांच्या शेअरसाठी खरेदीदारांची झुंबड, विदेशी गुंतवणूकदार सरसावले,रोज लागतंय अप्पर सर्किट
इंटेग्रा एस्सेन्टिया कंपनीच्या शेअरला दोन सत्रात 5 टक्के अप्पर सर्किट लागलं आहे. कंपनीचा शेअर आज 3.36 रुपयांपर्यंत पोहोचला होता. एनएसईवर या कंपनीच्या 15.8 लाख शेअरचे व्यवहार झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंटेग्रा एस्सेन्टियाच्या शेअरमध्ये गेल्या पाच वर्षात 1060 टक्के वाढ झाली आहे. यामुळं गुंतवणूकदारांचे पैसे 11 पाट वाढले आहेत. या काळात ज्यांनी 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती त्यांची रक्कम 1.06 लाख रुपये झाली.
10 डिसेंबरपर्यंत कंपनीची मार्केट कॅप 358.74 कोटी रुपये होती. कंपनीवर 7.38 कोटींचं कर्ज आहे.
इंटेग्रा एस्सेन्टिया कंपनी भोजन, कपडे, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात काम करते.30 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीच्या प्रमोटर्सनी गेल्या तिमाहीत त्यांची भागिदारी 20.81 टक्क्यांवरुन15.98 टक्के वर आणली होती.
20 सप्टेंबर 2024 पर्यंत या कंपनीत रिटेल गुंतवणूक दारांची भागिदारी 83.51 टक्के भागिदारी आहे.(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)