Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले

भारतीय शेअर बाजारात गेल्या चार दिवसांपासून घसरण सुरु आहे. याकालावधीत गुंतवणूकदारांचे 7.68 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून त्यांच्या समभागांची विक्री सुरु असल्यानं बाजारात चिंतेचं वातावरण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या चार सत्रांपासून बीएसई सेन्सेक्स 1272.01 अंकांनी म्हणजेच 1.61 टक्क्यांनी घसरला. सोमवारी बीएसईवरील सेन्सेक्समध्ये असलेल्या 30 कंपन्यांच्या शेअरची कामगिरी समाधानकारक न राहिल्यानं सेन्सेक्स 548.39 अंकांनी म्हणजेच 0.70 टक्क्यांनी घसरुन 77311.80 वर बंज झाला.

बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 7 लाख 68 हजार 252.32 कोटी रुपयांनी घसरुन 4 कोटी 17 लाख 82 हजार 573.59 कोटी रुपयांवर आलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील अन् अॅल्यूमिनिअमवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर देशांतर्गत शेअर बाजारात घसरण झाली, असं विश्लेषक अमेया रणदिवे यांनी म्हटलं.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सोमवारी देखील समभागांची विक्री करुन पैसे काढून घेण्याचा ट्रेंड कायम राहिला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 2463.72 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1515.52 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील अन् अॅल्यूमिनिअमवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर निफ्टी रिअल्टी इंडेक्समधील 10 स्टॉक्स, निफ्टी मेटल इंडेक्समधील 15 स्टॉक्समध्ये घसरण झाली. शोभा मार्कोटेक डेव्हलपर्स, ब्रिगेड एंटरप्रायझेस, डीएलएफ, गोदरेज प्रॉपर्टीज, नॅशनल अॅल्यूमिनिअम, सेल, वेदांता, एनएमडीसी,वेलकॉर्प, टाटा स्टील या कंपन्यांचे शेअर घसरले. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)