Closing Bell: शेअर बाजारात तेजी तरीही गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान
गुरुवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने प्रथमच 66,000 अंकांचा टप्पा गाठला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर बाजाराचा निर्देशांक दिवसभरातील उच्चांकावरून घसरला. सेन्सेक्स निर्देशांक दिवसभरातील उच्चांकावरून 600 अंकांनी खाली घसरला. तर, निफ्टीतही 180 अंकांची घसरण पाहायला मिळाली.
गुरुवारी, सकाळच्या सत्रात व्यवहारात सेन्सेक्स 770 आणि निफ्टी 183 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता.
आज दिवसभरातील व्यवहाराअंती बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 165 अंकांच्या उसळीसह 65,558 वर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांच्या तेजीसह 19,413 अंकांवर बंद झाला.
आज दिवसभरातील मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये नफावसुलीने घसरण दिसून आली.
ऑटो, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर आदी स्टॉक्स घसरणाीसह बंद झाले.
आयटी, बँकिंग, मेटल्स, रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली. टीसीएसच्या सकारात्मक तिमाही निकालामुळे आयटी इंडेक्स 500 अंकांनी वधारला.
रिलायन्स इंडस्ट्रीजसह मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.
याच्या परिणामी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 295.96 लाख कोटी इतके झाले. बुधवारच्या तुलनेत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.65 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.