Rakesh Jhunjhunwala : झुनझुनवाला यांच्याकडून शिकू शकता 'या' पाच गोष्टी
राकेश झुनझुनवाला यांनी विविध कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून त्यांनी अनेकदा गुंतवणूकदारांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. राकेश झुनझुनवाला खरेदी करत असलेल्या शेअर्सकडे अनेकांचे लक्ष असायचे. झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात अभ्यास आणि शिस्त यांच्या जोरावर बाजारात चांगला नफा कमावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर दराचा आदर करा: शेअर दराचा नेहमी आदर करा. प्रत्येक दरावर एखादा खरेदी करणारा असतो आणि एखादा विक्री करणारा असतो. कोण योग्य आणि कोण चुकीचा आहे, हे वेळ ठरवते. त्यामुळे शेअर दराचा आदर करा. काही वेळेस तुम्हीदेखील चुकीचे ठरू शकता.
उधारीच्या पैशांनी गुंतवणूक नको: उधारीच्या पैशांनी कधीच गुंतवणूक करू नका. शेअर बाजाराबाबत तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. तुम्ही एखाद्या वेळी एका कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि तुमच्या अंदाजानुसार त्या शेअरचा दर वधारला अथवा घसरला नाही तर तुम्हाला नुकसान होऊ शकते. अशावेळी उधारीने घेतलेल्या पैशांमुळे तुमची चिंता आणखी वाढू शकते.
गुंतवणूक शिकवली जाऊ शकत नाही: तुम्ही ज्या चुका सहन करू शकता, अशाच चुका करा. त्यामुळे पुढील तुम्ही पुढील चुका टाळू शकता. तुम्ही जी चूक करता तीच चूक पुन्हा करणे टाळले पाहिजे. त्याच चुका वारंवारपणे करणे म्हणजे तुम्ही भूतकाळातून काही शिकलाच नाहीत, असा अर्थ होतो.
RISK पासून सावध: RISK या चार शब्दांपासून सावध राहा. शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही जेवढे नुकसान सहन करू शकता. तेवढीच गुंतवणूक करा. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तुम्ही रिस्क प्रोफाइल तपासून पाहायला हवे. अनेकदा गुंतवणूकदार अधिक जोखीम स्वीकारतात आणि स्वत: च्या अडचणी वाढवतात.
आशावादी राहा: शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला आशावादी राहावे लागेल. गुंतवणूकदार म्हणून आशावादी असले पाहिजे. शेअर बाजारात तुमच्या संयमाची, धैर्याची परीक्षा होते. शेअर बाजारात उतावीळ असणे चांगले नसते.