Investment Tips: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतील गुंतवणूक लय भारी; चांगला परतावा आणि कर सवलतही!
पोस्ट विभागाच्या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोस्ट विभागाच्या योजनेतील गुंतवणूक ही सुरक्षित समजली जाते.
या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला सरकारी हमी मिळते.
त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्याचा धोका कमी असतो.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेत तुम्हाला सरकारची हमी मिळते.
या योजनेत तुम्ही तुमचे पैसे एकूण 5 वर्षांसाठी गुंतवू शकता.
यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मुदत ठेवीपेक्षा जास्त परतावा मिळतो.
NSC योजनेत, गुंतवणूकदाराला वार्षिक आधारावर 6.8 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो.
या योजनेअंतर्गत, तुम्हाला आयकर सवलत कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची सूट मिळते.
या योजनेअंतर्गत तुम्ही संयुक्त खातेदेखील उघडू शकता. 10 वर्षांवरील मुलेदेखील यामध्ये गुंतवणूक करू शकतात.
जर तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपयापर्यंत व्याज मिळेल.