FD Investment: मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचे आहेत 'हे' फायदे
भारतात आजही बहुतांशीजण सुरक्षित आणि निश्चित परतावा म्हणून मुदत ठेवीत (Fixed Deposit) गुंतवणूक करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफक्त सुरक्षित गुंतवणूक म्हणून मुदत ठेव एवढाच फायदा नसून त्याचे इतरही फायदे आहेत.
मुदत ठेवीत गुंतवणूक करणे ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते.
बाजारातील गुंतवणुकीत असणारी जोखीम मुदत ठेवीत नसते.
बँकेतील मुदत ठेवीवर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा उपलब्ध होते.
अनेकदा बँक कर्ज देताना हमी मागते. अशावेळी मुदत ठेव ही हमीच्या स्वरुपात वापरून कर्ज (Loan Against FD) मिळवू शकता.
कर बचतीच्या मुदत ठेवीमध्ये तुम्हाला आयकर कायद्यातील 80 सी कलमानुसार 1.5 लाखापर्यंतची करसवलत मिळते.
मुदत ठेवीच्या योजनेवर विमादेखील देतात. इन्शुरन्स कव्हर मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागते.
बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याज दर रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरावर अवलंबून असतो.
मुदत ठेव योजनेतील तुमच्या गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यास आणि पैशांची आवश्यकता नसल्यास तीच रक्कम व्याजासह पुन्हा गुंतवू शकता.