Gold Harvest Scheme : यंदा सणासुदीला सोनं खरेदी करताना 'या' चुका टाळा, योजनांमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या...
स्थानिक सराफा व्यापारी ग्राहकांसाठी काही अशा योजना ठेवतात, ज्यामध्ये दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करावे लागतात आणि नंतर दागिना मिळतो. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात सण-उत्सव म्हटलं की, सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. भारतातील दरवर्षी सणासुदीच्या काळात सोन्याची विक्री वाढते. (PC:istock)
त्यामुळे यंदा सणासुदीच्या काळात सोने खरेदी करायला गेलात तर हा हिशेब नक्कीच लक्षात ठेवा. (PC:istock)
तुम्हालाही सणांच्या काळात सोने खरेदी करायच्या विचारात असाल तर, तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी एक महत्त्वाची जाणून घ्या. (PC:istock)
दुसरीकडे, सर्वात कमी परतावा देणार्या गुंतवणुकीपैकी एक पर्याय म्हणजे FD मध्ये तुम्हाला 7-8 टक्के वार्षिक परतावा मिळतो. पण सोन्यामध्ये तुम्हाला सुमारे 16 टक्के वार्षिक परतावा मिळतो. त्यामुळे यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त सराफा दुकानदारांचा फायदा होतो. (PC:istock)
ज्वेलरी दुकानदारांकडे गोल्डन हार्वेस्ट स्कीम नावाची एक योजना आहे. गोल्डन हार्वेस्ट ही योजनेचा फायदा तुम्हाला नाही, तर सराफा व्यापाऱ्यांना होतो. (PC:istock)
गोल्डन हार्वेस्ट ही योजना अनेक तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये पाहिली असेल. यामध्ये तुम्हाला दर महिन्याला योजनेत ठराविक रक्कम जमा करण्याची ऑफर मिळते. साधारणपणे ही योजना 10-12 महिन्यांसाठी उपलब्ध असते. दुकानदार तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा देतो आणि तुम्हाला जमा केलेल्या पैशावर आणि शेवटच्या हप्त्यानंतर परतावा देऊन सोने खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. (PC:istock)
समजा तुम्ही दरमहा 5-5 हजार रुपये गुंतवता आणि ज्वेलर्सने तुम्हाला 10 महिन्यांची स्कीम दिली आहे आणि 55 टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे. तर त्यामागचं नेमकं समीकरण काय, ते जाणून घ्या. (PC:istock)
तुम्ही 10 महिन्यांत गुंतवलेली एकूण रक्कम 50 हजार रुपये होती. यावर तुम्हाला ज्वेलर्सकडून 2,750 रुपयांचा परतावा मिळेल. आता या संपूर्ण रकमेवर वार्षिक परतावा मोजला तर तो फक्त 1 टक्के येतो. (PC:istock)