PHOTO : FD मध्ये गुंतवणूक करताय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या, होईल फायदा
अनेक लोक त्यांचे पैसे कोणत्याही जोखमीच्या योजनांमध्ये गुंतवण्याऐवजी जोखीममुक्त योजनांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. आजही देशात एक मोठा मध्यमवर्ग आहे, जो बँकेत एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतो. वेगवेगळ्या बँकांमध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही महिन्यांत, SBI, Axis Bank, HDFC बँक, बँक ऑफ बडोदा इत्यादी अनेक बँकांनी त्यांच्या FD च्या व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्ही देखील बँकेच्या FD म्हणजेच, मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही वेळेआधीच FD मोडल्यास तुम्हाला कमीत कमी नुकसान होईल. या टिप्सबद्दल जाणून घ्या.
एफडी लॅडरिंग हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही एकूण 5 लाख रुपयांची एफडी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या पाच एफडी कराव्या लागणार आहेत. यामुळे, आपत्कालीन परिस्थितीत पैसे तोडण्यात तुम्हाला त्रास होणार नाही.
यामुळे, जर तुम्हाला मुदतीपूर्वी 2 लाख रुपयांची अचानक गरज भासली, तर तुम्ही फक्त दोनच एफडी मोडाल आणि तुम्हाला उर्वरित तीन एफडीवर पूर्ण व्याजाचा लाभ मिळेल. यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे गुंतवताना विविध प्रकारचे अतिरिक्त फायदेही मिळतील.
तुम्ही 10 लाख रुपयांसारख्या मोठ्या रकमेची एकाचवेळी FD केल्यास तुम्हाला 30 टक्के टॅक्स स्लॅबनुसार, कर कपात मिळेल. यामुळे तुम्हाला व्याजावर जास्त नफा मिळणार नाही. त्यामुळे अल्प रकमेत कमी व्याजदर मिळाले तरी कमी कर भरावा लागेल आणि आपत्कालीन परिस्थितीत कमी तोटा होईल.
जर तुम्ही बँकेत दीर्घ कालावधीसाठी FD ची योजना करत असाल, तर अशा परिस्थितीत तुम्ही बँकेच्या विशेष योजना जसे की 444 दिवस, 659 दिवस, 888 दिवस इत्यादींमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदे मिळवू शकता. यामध्ये अनेक वेळा तुम्हाला जास्त व्याज दरासारखे अतिरिक्त फायदे मिळतात.
जर तुम्हाला एफडीवर जास्त परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही मोठ्या बँकांऐवजी स्मॉल फायनान्स बँकांमध्ये एफडी करू शकता. मोठ्या बँकांपेक्षा लहान फायनान्स बँका जास्त व्याजदर देतात. यासोबतच ग्राहकांना अतिरिक्त विमा संरक्षणाची सुविधाही मिळते.