Financial Rules : 1 ऑगस्टपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम, सर्वसामान्यांच्या खिशावर काय परिणाम होईल? जाणून घ्या
जुलै महिन्याचे अखेरचे काही दिवस राहिले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनेक नियम बदलतील ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत.(PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत आयकर रिटर्न भरला नसेल तर तुम्हाला दंड भरून 1 ऑगस्टपासून आयटीआर भरावा लागेल. (PC : istock)
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. (PC : istock)
तेल कंपन्या साधारणपणे 1 आणि 16 तारखेला एलपीजीच्या नव्या किमतीत जाहीर करू शकतात. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीतही बदल होऊ शकतो.(PC : istock)
ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची काम असतील तर वेळीच करुन घ्या. कारण, या महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्या खिशावर परिणाम होणार आहे. (PC : istock)
अॅक्सिस बँकचं क्रेडिट कार्ड आणि Flipkart वरून खरेदी करणाऱ्या लोकांना आता 12 ऑगस्टपासून क्रेडिट कार्डच्या खरेदीवर कमी कॅशबॅक मिळेल.(PC : istock)
SBI च्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे. ही 400 दिवसांची विशेष FD योजना आहे, ज्यामध्ये सामान्य लोकांना 7.1 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीवर 7.6 टक्के व्याजदर मिळेल.(PC : istock)
1 ऑगस्टपासून हे आर्थिक नियम बदलणार आहेत आणि याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.(PC : istock)