Investment Tips : SBI FD की पोस्ट ऑफिस TD योजना? कुठे गुंतवणूक केल्यावर 5 वर्षात जास्त फायदा, जाणून घ्या...
आजच्या काळात, गुंतवणूकदारांकडे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत, पण आजही देशातील अनेक लोक एफडी योजनेतील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय मानतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबरेच ज्येष्ठ नागरिक अजूनही त्यांचे निवृत्तीचे पैसे मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणं पसंत करतात. पण याशिवायही गुंतवणुकीच्या अनेक योजना आहेत.
जर तुम्हाला देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या FD स्कीम म्हणजेच मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी.
आम्ही तुम्हाला स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना या दोन्हीचे व्याजदर आणि फायदे यांची माहिती सविस्तर वाचा. एसबीआय एफडी आणि पोस्ट ऑफिस टीडी योजना यामधील फरक समजून घ्या.
भारतीय स्टेट बँकेची मुदत ठेव म्हणजे SBI FD योजनेबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ग्राहक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजनेत गुंतवणूक करु शकतात. यामध्ये सर्वसामान्य ग्राहकांना 3.00 टक्के ते 6.50 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.
भारतीय स्टेट बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 7.50 टक्के व्याजदर देत आहे. अमृत कलश (444 दिवसांची FD) विशेष एफडी योजना अंतर्गत बँक सर्वसामान्यांना 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.60 टक्के व्याजदर देत आहे. ही विशेष योजना 15 ऑगस्ट 2023 पर्यंतच वैध आहे.
त्याशिवाय, पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांना 1 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना देखील ऑफर करत आहे. या योजनेअंतर्गत 1 वर्षाच्या मुदत ठेव (FD) वर 6.9 टक्के व्याजदर मिळत आहे.
तसेच, पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत 2 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के, 3 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के आणि 5 वर्षांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याजदर मिळत आहे.
SBI आणि पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या FD वर, आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट देण्यात येत आहे.
जर तुम्हाला 5 वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असतील, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे, कारण यामध्ये सामान्य लोकांना देखील 7.50 टक्के व्याजदर मिळत आहे.