Ola-Uber Cancellation : ओला, उबरला सरकारचा दणका! बुकिंग रद्द केल्यास कंपनीला द्यावे लागणार पैसे
तुम्हीही कॅबने प्रवास करत असाल तर नक्कीच तुम्हाला अनेकदा या समस्येचा सामना करावा लागला असेल. कॅब वापरणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला ही समस्या येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएका सर्वेक्षणानुसार, कॅब प्रवाशांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे चालकांकडून वारंवार बुकिंग रद्द होणे.
काहीवेळा वाहनचालक लोकेशन पाहून जाण्यास नकार देतात, तर कधी रोख रक्कम देण्याची मागणी करतात. या कारणांमुळे काही वेळा प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागतं.
तुम्हालाही कधी अशा समस्येचा सामना करावा लागला असेल तर आता या समस्येतून सुटका होणार आहे. सरकारने यावर उपाय शोधला आहे.
महाराष्ट्र सरकारने कॅबबाबत नवी नियमावली तयार करण्यात येत आहे. यामध्ये कॅब रद्द करण्यासंबंधित नियमांचा देखील समावेश आहे.
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, कॅब संबंधित नवीन नियमांमध्ये बुकिंग रद्द केल्यास कॅब कंपन्यांना प्रवाशांना भरपाई द्यावी लागेल, अशी तरतूद असू शकते.
ओला आणि उबेर यासारख्या कंपन्यांनी बुकिंग रद्द केल्यास चालकांना दंड आकारण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे.
प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आर्थिक भरपाई किंवा पुढील राइडवर सवलत देण्यात यावी, असाही प्रस्ताव आहे.
कॅब संदर्भात नवे नियम लागू झाल्यास कॅब प्रवाशांची चिंता मिटणार आहे.
यामुळे कॅब चालकांवर सरकारचाही जम बसेल.