शेतकऱ्यांनो मुगाचे हे वाण शेतात लावा आणि व्हा श्रीमंत!
आधुकनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आज शेती सोपी आणि किफायतशीर झाली आहे. आता मूग या पिकाच्या MH1142 या वाणामुळे शेतकऱ्यांना मूग शेती करताना भरघोस फायदा होऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वाणाची रोगप्रतिकाशक्ती इतर वाणांच्या तुलनेच चांगली आहे. हे वाण स्वत:चे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करते. विशेष म्हणजे लागवण केल्यानंतर अवघ्या 63 ते 70 दिवसांत हे पिक काढणीला येते.
मुगाची शेती खरीप हंगामात केली जाते. या वाणाची एक विशेषता म्हणजे या वाणाचे प्रत्येक झाड सोबतच काढणीला येते. या वाणाची पाने कमी पसरतात तसेच त्यांच्या झाडांची मर्यादित वाढ होते.
63 ते 70 दिवसांत काढणीला येणारे हे वाण प्रदेश आणि मातीतील फरकानुसार 12 क्विंटल ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्त्पन्न मिळवून देते.
या वाणाची जास्त वाढ होत नसल्यामुळे मुगाची काढणी झाल्यानंतर उर्वरित अवशेषांना जाळण्याचीही गरज भासत नाही. मुगाच्या झाडाचे अवशेष शेतातच कुजून जातात. त्याचा फायदा पुढील पिकास होतो. (वरील लेख हा प्राथमिक माहितीवर आधारित आहे. प्रत्यक्ष शेती करायची असल्यास या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मगच शेती करावी.)