Mhada Lottery 2024 : म्हाडाची 2030 घरांची सोडत काही तासांवर, मुंबईतील घराचं स्वप्न पाहणाऱ्यांची धाकधुक वाढली, थेट प्रक्षेपण कुठं पाहता येणार?
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांची संगणकीय सोडत उद्या काढण्यात येणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appम्हाडाकडून उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबरला सोडतीचं आयोजन करण्यात आलं आहे. म्हाडाच्या या सोडतीला मुंबईकरांचा दमदार प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबईतील गोरेगाव, दादर, वडाळा, विक्रोळी, दादर, कुर्ला मालाड, या भागातील 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. राज्य सरकारनं विकासकांकडून मिळालेल्या घरांच्या किमती कमी केल्यानंतर आणि अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्यानं अर्जदारांच्या संख्येत वाढ झाली.
म्हाडानं काही दिवसांपूर्वी सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. उद्या ज्यांना घरं लागली आहेत त्या विजेत्यांची नावं जाहीर होतील. तर, ज्यांना घरं लागणार नाहीत त्यांची अनामत रक्कम 9 ऑक्टोबरपासून परत देण्यास सुरुवात केली जाईल.
मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या संगणकीय सोडतीचं थेट प्रक्षेपण म्हाडाच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरुन केलं जाईल.