अर्थसंकल्पापूर्वीच गुड न्यूज; सामान्यांच्या खिशावरील भार कमी होणार, वाचा
महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या गॅस दरात मोठी कपात केली आहे.
31 जानेवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून सीएनजी गॅस दरात कपात करण्यात आली आहे.
सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
महागाईत होरपळणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे.
मध्यरात्रीपासून नवीन किंमती नुसार 87 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे.
पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे.
मुंबई महानगर क्षेत्रात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे.
सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते.
दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे.