जाणून घ्या: मुदतीआधीच एफडी मोडल्यास किती दंड भरावा लागणार?
Premature FD Withdrawal: अनेकजण सुरक्षित गुंतवणूक आणि चांगल्या परताव्यासाठी विविध गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. आजही सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बँकांमधील मुदत ठेवीत गुंतवणूक करतात. रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुदत ठेवीवरील व्याज दरातही वाढ झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेअर बाजारात असलेल्या अस्थिर आणि घसरणीमुळे सध्या अनेकजण जोखीम मुक्त गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. बँकांमधील एफडीवर गुंतवणूक करण्याचे काही फायदे आहेत. त्याशिवाय, तुम्हाला पैशांची गरज भासल्यास एफडीची रक्कम तात्काळ मोडता येऊ शकते.
मुदत संपण्याआधी तुम्ही एफडी मोडल्यास बँक ग्राहकांकडून पेनल्टी म्हणून काही रक्कम घेते. प्रत्येक बँकेची पेनल्टी वेगवेगळी असते.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एखाद्या व्यक्तीने पाच लाखांपर्यंतची एफडी मुदती आधीच मोडल्यास एकूण रक्कमेच्या 0.50 टक्के तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल. तर, पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम असल्यास एक टक्के रक्कम पेनल्टी म्हणून वसूल केली जाते.
पीएनबी खातेदारांनी मुदतीआधीच एफडी मोडल्यास अशा स्थितीत एफडीमधील एकूण रक्कमेचा एक टक्का पेनल्टी म्हणून घेतली जाते.
अॅक्सिस बँकेत एफडी मुदती आधीच मोडल्यास, ग्राहकांना एक टक्के पेनल्टी लागू शकते. जर, तुम्ही एफडीमधील 25 टक्के रक्कम काढल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही.
यस बँक ग्राहकांना पाच कोटींहून कमी रक्कमेची मुदत ठेव मुदतीआधीच मोडल्यास तुम्हाला 0.75 टक्के पेन्लटी लागेल.
आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळानुसार, मुदती आधीच एफडी मोडल्यास तुम्हाला 0.50 टक्के पेन्लटी भरावा लागू शकतो.