IRCTC Leh Ladakh Tour: सुट्ट्यांमध्ये लडाखला द्या भेट, जाणून घ्या किती होईल खर्च
हे टूर पॅकेज दिल्ली ते लडाख असं असणार आहे. हे पॅकेज भारतीय रेल्वेच्या IRCTC ने लॉन्च केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया टुरसाठी तुम्ही एकटे गेल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 46,950 रुपये शुल्क द्यावे लागेल. दोन लोकांसाठी 39,900 रुपये आणि तीन लोकांसाठी 38,990 रुपये शुल्क भरावे लागेल.
या टूरमध्ये तुम्हाला लेह, नुब्रा व्हॅली, तुर्तुक पॅंगॉन्ग लेकला भेट देण्याची संधी मिळेल.
या पॅकेजद्वारे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये म्हणजे मे आणि जून महिन्यात लेह-लडाखला भेट देऊ शकता.
IRCTC कडून प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील दिले जाईल.
या टूरमध्ये तुम्हाला विमानाने जाण्याची आणि येण्याची सुविधा मिळेल. तुम्ही दिल्ली ते लेह आणि नंतर पुन्हा दिल्लीला विमानाने परत जाऊ शकता.
या पॅकेजमध्ये तुम्हाला जाण्यासाठी आणि येण्यासाठी कॅबची सुविधा मिळेल. ही कॅब नॉन एसी आणि शेअरिंग आधारावर असेल.
यासोबतच तुमच्या राहण्याची देखील व्यवस्था केली जाईल.राहण्यासाठी हॉटेलची सुविधा देण्यात येईल.
आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला ऑक्सिजन सिलेंडर मिळेल.