अॅफकॉन गेला, गोदावरी गेला, आता झिंका आयपीओकडे सर्वांचे लक्ष, GMP वर मिळतोय मदार प्रतिसाद; जाणून घ्या बँड प्राईस किती?
Zinka Logistics IPO: झिंका लॉजिस्टिक्स ही कंपनी ट्रक ऑपरेटर्सना डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्व्हिस देते. या कंपनीचा आयपीओ 13 नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होतोय. चालू महिन्यातील हा पाचवा आयपीओ आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया कंपनीने आपल्या आयपीओचा किंमत पट्टा 259-273 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 18 नोव्हेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येईल. बीएसई आणि एनएसईवर हा आयपीओ लिस्ट होणार आहे.
ग्रे मार्केटमध्ये या आयपीओला ठिक ठाक प्रतिसाद मिळत आहे. 11 नोव्हेंबर रोजी ग्रे मार्केटवर या आयपीओचा शेअर 24 रुपयांच्या प्रिमियमवर ट्रेड करत होता.
या मूल्यानुसार हा आयपीओ 297 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आयपीओतील शेअर अलॉट झालेल्यांना साधारण 8.79 टक्क्यांपर्यंत नफा होण्याची शक्यता आहे.
ही कंपनी आपल्या आयपीओतून1115 कोटी रुपये उभे करणार आहे. या आयपीओअंतर्गत 550 कोटी रुपयांचे 2.01 कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जाणार आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)