IPO Allotment : शेअर बाजारात पाच आयपीओ लिस्टींगसाठी वेटिंगवर, IPO अलॉटमेंट स्टेटस कसं तपासणार?

शेअर बाजारात 27 डिसेंबरला पाच मेनबोर्ड आयपीओ लिस्ट होत आहेत. ट्रान्सरेल लायटिंग, ममता मशिनरी, डीएएम कॅपिटल अॅडव्हायजर, सनातन टेक्स्टाइल, कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्स या कंपन्यांचे आयपीओ परवा शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या सर्व आयपीओंना गुंतवणूकदारांनी दमदार प्रतिसाद दिला आहे. ट्रान्सरेल लायटिंग आयपीओ 63.62 पट सबस्क्राइब झाला. हा आयपीओ 838.91 कोटींच्या उभारणीसाठी आला होता.

ममता मशिनरीचा आयपीओ 179.39 कोटींच्या उभारणीसाठी आला होता. हा आयपीओ 167 पट सबस्क्राइब झाला आहे. ममता मशिनरीचा किंमतपट्टा 243 रुपये असून जीएमपी 260 रुपयांवर आहे.
डीएएम कॅपिटलचा आयपीओ 840.25 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल होता. हा आयपीओ 62.02 पट सबस्क्राइब झाला. सनातन टेक्स्टाइल या कंपनीचा आयपीओ 25 पट सबस्क्राइब झाला आहे. तर, कॉनकॉर्ड एनवारो सिस्टीम्सचा आयपीओ 7.52 पट सबस्क्राइब झाला.
आयपीओ अलॉट झाला की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही बीएसईच्या https://www.bseindia.com/static/investors/application_statuschecksystem.aspx या वेबसाइटला भेट देऊ शकता. तिथं तुम्ही ज्या कंपनीचा आयपीओ सबस्क्राइब केला आहे, त्या कंपनीचं नाव निवडा. यानंतर अर्ज क्रमांक किंवा पॅन कार्ड क्रमांक नोंदवून तुम्हाला आयपीओ अलॉट झाला की नाही हे पाहा. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)