Vodafone Idea मध्ये सरकारला 35 टक्के भागीदारी, जाणून घ्या कसं ते
भारत सरकार आता व्होडाफोन-आयडिया कंपनीत सगळ्यात मोठा भागीदार असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरकारने 16,133 कोटी रुपयांहून अधिक व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली.
केंद्र सरकारला व्होडाफोन-आयडिया कंपनीचे 10 रुपयाच्या मूल्याचे इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.
व्याजाच्या रक्कमेपोटी केंद्र सरकारला व्होडाफोन -आयडिया कंपनीत भागिदारी मिळाली आहे.
त्यामुळे आता या कंपनीत भारत सरकारची भागिदारी ही जवळपास 35 टक्के इतकी होणार आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीत आता प्रमोटर कंपनी Vodafone चा हिस्सा 28.5 टक्के असणार.
आदित्य बिर्ला कंपनीचा हिस्सा 17.8 टक्के इतका होणार आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर केलेल्या सुधारणा पॅकेजचा भाग म्हणून व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यात आले.
इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणारी एकूण रक्कम 16133,18,48,990 इतकी आहे.
या रक्कमेच्या बदल्यात व्होडाफोन -आयडिया कंपनीमध्ये भारत सरकारला 1613,31,84,899 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.