Income Tax : 2022 मध्ये टॅक्स वाचवायचा आहे? 'या' गुंतवणुकीच्या पर्यायांचा वापर करून सूट मिळवा
प्रत्येक नोकरी करणाऱ्या व्यक्तीला वर्षातून कमाईचा एक हिस्सा टॅक्सच्या स्वरूपात द्यावा लागतो. यासाठी तुम्हाला बचत आणि गुंतवणूक यांच्यात योग्य संतुलन साधावं लागतं. तुम्ही योग्य नियोजन करून टॅक्सची बचत करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2022 मध्ये आम्ही तुम्हाला अशा काही टॅक्स सेविंग योजनेबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही टॅक्सवर सवलत मिळवू शकता.
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP)या माध्यमातून तुम्हाला इन्शुरन्स आणि गुंतवणूक दोन्ही मिळते. यामध्ये तुम्हाला 1.5 लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत टॅक्स सूट मिळते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही एक अतिशय प्रसिद्ध योजना आहे. यामध्ये तुम्हाला गुंतवणुकीवर टॅक्स सूट मिळते. यासोबतच गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याजदरही मिळतो. तुम्हाला 1.5 लाखांच्या गुंतवणुकीपर्यंत कर सूट मिळू शकते.
सरकारी आणि खाजगी कर्मचारी नॅशनल पेन्शन योजनेत (NPS)गुंतवणूक करू शकतात. ही देखील एक कर बचत योजना आहे. यामध्ये, आयकराच्या ( Income Tax)नियम 80 CCD(1B)नुसार, तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. त्याचबरोबर तुम्हाला अतिरिक्त 50,000 रूपयांची सवलत मिळू शकते.
होम लोनच्या परतफेडीवर तुम्हाला टॅक्सवर सूट मिळते. कर्जाच्या मुद्दलाचा ईएमआय (EMI)भरल्यानंतर, तुम्हाला इनकम टॅक्सचे नियम 80 Cनुसार तुम्हाला 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर (Tax)सूट मिळू शकते.