सोन्यानं गाठला उच्चांक! दर 72 हजारांच्या पुढे, दरात वाढ होण्याचं कारणं काय?
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appध्या बाजारात सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहयला मिळत आहे.
वर्षभरात सोन्याच्या दरात 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ मोठी आहे.
आज सोन्यानं गाठला 72,120 रुपयांचा टप्पा, ही सोन्याची विक्रमी पातळी आहे.
अमेरिकेत महागाई पुन्हा वाढली आहे, त्यामुळं फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात अनिश्चितता आहे. या परिस्थितीमुळं सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं बोलंल जातंय.
जागतिक आर्थिक मंदीच्या स्थितीमुळं अनेक देश सोन्यात गुंतवणूक करताना दिसतायेत. त्यामुळं मागणी वाढल्यानं दरात वाढ होतेय.
जगभरातील विविध केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढलीय. त्याचा परिणाम दरांवर झालाय.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोनं 75 हजार रुपयांच्या पुढ जाण्याची शक्यता आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत जगभरातील विविध केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी वाढली आहे. यंदा सोन्याच्या किमतीत झालेल्या 14 टक्क्यांच्या तेजीसाठी हा एक मोठा घटक मानला जात आहे.
आगामी काळातही सोन्यासाठी अनुकूल संधी निर्माण होत असल्याचे बाजार विश्लेषकांचे मत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीतील वाढ कायम राहू शकते आणि वर्षअखेरीस सोन्याचा भाव 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.