SIP च्या माध्यमातून तुम्हीही होऊ शकता करोडपती! फक्त 'या' सूत्राचं पालन करा!
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर चरितार्थ कसा भागवायचा, हा प्रश्न सर्वांपुढेच असतो. नोकरीला असल्यापासूनच निवृत्तीनंतरच्या आयुष्याचे नियोजन करायला हवे. त्यासाठी आतापासूनच आर्थिक बचत केली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच SIP ला सुरुवात केल्यास वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्ही कोट्यधीश होऊ शकता आणि आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात घालवू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक व्यक्ती वयाच्या 60 वर्षांपर्यंत नोकरी करते, असे गृहित धरले जाते. त्यानुसार वायाच्या 60 व्या वर्षी कोट्यधीश व्हायचे असेल तर तुमच्याकडे नोकरीचे किती वर्षे शिल्लक आहेत, ते पाहावे लागेल. तुमचे वय 25 वर्षे असेल तर तुमच्याकडे नोकरीचे आणखी 35 वर्षे आहेत. तुमचे वय 30 वर्षे असेल तर तुमचे नोकरीची 30 वर्षे शिल्लक आहे. तुमचे वय 35 वर्षे असेल तर तुमच्याकडे नोकरीची 25 वर्षे शिल्लक आहेत. याच नोकरीच्या शिल्लक राहिलेल्या वर्षांनुसार तुम्ही एसआयपी करून वयाच्या 60 वर्षांपर्यंत कोट्यधीश होऊ शकता.
तुमच्याकडे नोकरीची 35 वर्षे शिल्लक राहिलेली असतील तर तुम्हाला महिन्याला फक्त 2000 हजार रुपयांची SIP चालू करावी लागेल. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही सलग 35 वर्षे गुंतवूक केल्यास तुम्ही वयाच्या 60 वर्षांपर्यंत 8,40,000 रुपये गुंतवणूक कराल. तुम्ही केलेल्या एसआयपीवर 12 टक्के व्याज गृहित धरल्यास तुम्हाला तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 60 व्या वर्षी एकूण 1,21,50,538 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला एकूण 1,29,90,538 रुपये मिळतील.
तुमच्याकडे नोकरीची 30 वर्षे शिल्लक असतील तर तुम्हाला महिन्याला 3000 रुपयांची SIP करावी लागेल. हीच एसआयपी वयाच्या 60 वर्षांपर्यंत चालू ठेवल्यास तुमची एकूण 10,80,000 रुपयांची गुंतवणूक होईल. 12 टक्के व्याज मिळाले, असे गृहित धरून तुम्ही गुंतवलेल्या या पैशांवर तुम्हाला 95,09,741 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला 1,05,89,741 रुपए मिळतील.
तुमचे सध्याचे वय 35 वर्षे असेल आणि वयाच्या 60 वर्षांपर्यंत तुम्ही नोकरी करणार आहात, असे गृहित धरल्यास तुमच्याकडे 25 वर्षे शिल्लक आहेत. तुम्ही महिन्याला 6000 रुपयांची SIP चालू केल्यावर 25 वर्षांत तुम्ही एकूण 18,00,000 रुपयांची बचत कराल. ज्यावर तुम्हाला 12 टक्क्यांच्या हिशोबाने एकूण 95,85,811 लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजे वयाचे 60 वर्षे झाल्यास तुम्हाला एकूण 1,13,85,811 रुपये मिळतील.
दरम्यान, एसआयपीएच्या माध्यामातून गुंतवणूक केल्यास तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर साधारण 12 टक्के व्याज मिळते, असे गृहित धरले जाते. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर चक्रवाढव्याज मिळते. त्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. शेअर बाजाराच्या तुलनेत म्यूच्यूअल फंडामध्ये धोका कमी असतो. त्यामुळे एसआयपी आणि म्यूच्यूअल फंड हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.