Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित महाग; वाचा तुमच्या शहरातील दर
नोव्हेंबर महिना सुरु झाला आहे. लग्नसराईचा काळ सुरु झाला आहे. या निमित्ताने ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) बाजारात गर्दी पाहायला मिळतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळशी विवाहापासून लग्नसराईला सुरुवात होते. या निमित्ताने लग्नमुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत ग्राहकांची सोने चांदी खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळते.
मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत घट पाहायला मिळतेय. त्यामुळे या दरम्यान मौल्यवान धातूंची जास्त खरेदी पाहायला मिळतेय.
आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.25 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 50,560 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 58,860 रुपये आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकमधली दर पाहता 22 कॅरेट सोन्याचा दर 46,347 वर आला आहे. तर हाच दर इतर शहरांतही दिसून आला.
जागतिक बाजारातील दर पाहता, स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले.
स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.
BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता.
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता.