Gold and silver price : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा तेजी, 24 कॅरेट सोन्याचा दर किती?
सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमेरिकन जॉब मार्केट डेटा आला आहे. कमकुवत आकडेवारीनंतर अर्थव्यवस्थेत पुन्हा मंदी येण्याची चिन्हे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात 1200 रुपयांची आणि सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली.
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 74200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
चांदीबद्दल बोललो तर चांदी 1200 रुपयांनी महाग झाली आहे. 85800 रुपयांवर चांदी गेली आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत 7193 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 7020 रुपये प्रति ग्रॅम आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात स्पॉट गोल्ड प्रति औंस 2497 डॉलर आणि चांदी 28 डॉलर प्रति औंसवर बंद झाली
फेडरल रिझर्व्ह या महिन्यात व्याजदरात मोठी कपात करण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळं पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोन्या चांदीच्या वाढत्या किंमतीमुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
आमखी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.