Government Schemes : मुलींसाठी 5 सरकारी योजना, शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता मिटेल
सध्याच्या काळात आपल्या मुलांचं आर्थिक नियोजन करणं अधिक गरजेचं झालं आहे. सरकारकडून मुलींसाठी अनेक योजना राबवल्या जातात, त्यात गुंतवणूक करून भविष्यात पैशाची कमतरता दूर करता येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुकन्या समृद्धी योजना ही अल्पबचत योजना आहे. या अंतर्गत जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी खातं उघडता येतं. या योजनेत पालक मुलीच्या नावानं खातं उघडू शकतात. यामध्ये किमान 250 रुपयांमध्ये खातं उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये सध्या 8 टक्के व्याज दिलं जातं. तुम्ही 21 वर्षांनंतर संपूर्ण रक्कम काढू शकता.
महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 (Maharashtra Lek Ladki Yojana 2023) आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
लेक लाडकी योजनेंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत राज्य सरकार आर्थिक मदत करेल. तसेच या योजनेत मुलगी 18 वर्षांची झाल्यावर राज्य सरकार 5 हप्त्यांमध्ये 75,000 रुपये एकरकमी रक्कम देईल.
उडान योजना (UDAN) ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. शालेय शिक्षण आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांमधील अंतर कमी करण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (MHRD) ही योजना सुरू केली आहे.
10 वी मध्ये किमान 70 टक्के आणि विज्ञान आणि गणित विषयात 80 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थीनी आहेत उडान योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. यासाठी www.cbse.nic.in किंवा www.cbseacademic.in या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
केंद्र सरकारने 2008 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी मुलींच्या प्रोत्साहनाची राष्ट्रीय योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत आठवी पास आणि नववीमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना लाभ दिला जातो.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींच्या नावावर 3000 रुपये जमा करते आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ही रक्कम व्याजासह दिली जाते.
दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या अनेक राज्यांचं सरकार मुलींसाठी खास योजना चालवतात. या योजनांचा लाभ घेऊन जन्मापासून लग्नापर्यंतचा खर्च उचलता येतो.