Fixed Deposit Interest Rate: गुंतवणुकीची चांगली संधी; दोन वर्षांच्या एफडीवर 5 वर्षांचे व्याज
मुदत ठेवींवर, या पाच बँका दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहेत. या बँकाकडून ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर दिला जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही महिन्यांपासून व्याज दरात वाढल्याने मुदत ठेवीवरील व्याज दरात वाढ झाली आहे.
मुदत ठेव हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय बनला आहे. अनेक बँका ग्राहकांना मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहेत.
DCB बँक दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.5 टक्के व्याज देत आहे. हा व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. त्याचबरोबर ही बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.75 टक्के इतका व्याजदर देत आहे.
इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षांच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज देत आहे. तर सर्वसामान्य नागरिकांसाठी ही बँक सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे.
RBL बँक ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षांच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना 10 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.80 टक्के व्याज दिले जात आहे.
अॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 7.8 टक्के व्याज देत आहे, तर सामान्य नागरिकांसाठी सर्वोच्च कालावधीसाठी सर्वाधिक व्याज ७.१ टक्के आहे.
एयू स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना दोन वर्षांच्या एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे, तर सामान्य नागरिकांना उच्च कालावधीसाठी जास्तीत जास्त 7 टक्के व्याज देत आहे.