फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
सध्या सोशल मीडियाशिवाय दिवस जाणं शक्यच नाही, त्यात तरुणाई किंवा सध्याची पिढी सोशल मीडियाशिवाय राहूच शकत नाही, असे दिसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब हे सध्याच्या प्रसिद्ध सोशल साईट्स आहेत. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वचजण या सोशल मीडियावर वेळ घालवतात.
सोशल मीडियावरील फेसबुक हे अॅप म्हणजे तर चावडीच बनलंय. अगदी फेसबुकचा संस्थापक किंवा मालका ह मार्क झुकरबर्ग आहे, हे जवळपास गावखेड्यातही माहिती आहे. मात्र, युट्युबचा संस्थापक कोण हे मात्र सहसा माहिती नाही.
सध्या व्हिडिओ फॉरमॅटमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या युट्युबची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 मध्ये झाली, याचदिवशी युट्यूब लाँच करण्यात आलं होतं. आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालं आहे. विशेष म्हणजे युट्युब आज तगड्या कमाईचं साधन बनलंय.
आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनेल हे T Series आहे. या चॅनेलला 275 मिलियन्स सब्सक्राईब्स आहेत. तर, गावखेड्यातील तरुण व युट्युबरही या चॅनेल्सच्या माध्यमातून चांगला पैसा कमवत आहेत.
स्टीव्ह चेन (Steve Chen), चाड हर्ले (Chad Hurley) आणि जावेद करीम (Jawed Karim) यांनी 2005 मध्ये युट्युबची (YouTube) सुरुवात केली होती. मात्र, नंतर या तिघांनी ते Google ला 165 कोटींना विकलं. आज या अॅपची क्रेझ मोठी असून प्रत्येक महिन्याला 200 अब्जांहून अधिक वापरकर्ते याचा वापर करतात.
या प्लॅटफॉर्मवरील पहिला व्हिडिओ 2005 साली 24 एप्रिल रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ YouTube सह-संस्थापक जावेद करीम यांनी अपलोड केला. या व्हिडिओचं शीर्षक 'मी अॅट द झू' आहे.
19 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जावेद यांनी एका झूमधील हत्तींबद्दल माहिती दिली होती. 'इथे आम्ही हत्तींसमोर उभे आहोत. हत्तींबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सोंड खूप लांब असते आणि हे खूप चांगले आहेत.', असं ते म्हणताना दिसून येतात