'हे' पाच स्टॉक खरेदी करा, अन् टेन्शन फ्री व्हा, मिळू शकतील दमदार रिटर्न्स?
Stock to Buy: वेगवेगळ्या ब्रोकरेज संस्थांनी शॉर्ट-टर्म, पोझिशनल आणि टेक्निकल ट्रेडर्ससाठी वेगवेगळे पाच शेअर्स सूचवले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App5Paisa या ब्रोकरेज फर्मने NMDC या शेअरला शॉर्ट-टर्म पिक सांगितले आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 242 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 226 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
JSW STEEL या शेअरवर Kotak Securities या ब्रोकरेज फर्मने पोजिशनल कॉल दिलेला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 1010- 1030 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 945 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टाईम फ्रेम 5 दिवसांचा दिला आहे.
रेलिगेयर या ब्रोकिंग फर्मने National Aluminium या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 249 रुपये प्रति शेअर तसेच स्टॉप लॉस 225 रुपये ठेवावा. 2-4 दिन दिवसांच्या टाईम प्रेममसाठी हे शेअर्स खरेदी करावेत.
IIFL सिक्योरिटीजने SBI या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 855 रुपये प्रति शेअर तसेच स्टॉप लॉस 818 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Nirmal Bang या ब्रोकरेज फर्मने Rashtriya Chemicals & Fertilizers या कंपनीला टेक्निकल पिक म्हणून सांगितलं आहे. त्यासाठी टार्गेट प्राइस 171 रुपये प्रति शेअर तर स्टॉप लॉस 153 रुपये ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यासाठी टाईम फ्रेम 1-2 दिवासांचा देण्यात आला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)