फक्त 'या' दोन शेअर्समध्ये करा गुंतवणूक, पडेल पैशांचा पाऊस!
सध्या शेअर बाजारात थोड्या-अधिक प्रमाणात पडझड पाहायला मिळत आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 53 अंकांनी घसरून 25145 अंकांवर स्थिरावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा स्थितीत सेठी फिनमार्ट या कंपनीने गुंतवणुकीसाठी दोन स्टॉक्स सुचवले आहेत. या दोन्ही स्टॉक्सचे टार्गेट काय आहे, स्टॉप लॉस काय असावा हे जाणून घेऊ या.
सेठी फिनमार्ट या कंपनीच्या तज्ज्ञांनी India Nippon Electricals या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर चार टक्क्क्यांपेक्षा वाढून 815 रुपयांवर बंद झाला. ही कंपननी ऑटो कंपोनंट तयार करते.
या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर 780 रुपयांचा स्टॉपलॉस तर 840 रुपयांचे टार्गेट ठेवायला हवे. ही कंपनी टू-व्हीलर्स आणि थ्री-व्हीलर्सचे पार्ट तयार करते.
HLE Glascoat ही एक इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स तयार करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. या शेअरमध्ये गुरुवारी दोन टक्क्यांपेक्षा अधिक तेजी पाहायला मिळाली. गुरुवारी हा शेअर 417 रुपयांवर बंद झाला. 4 जून रोजी हा शेअर 397 रुपये होता.
या शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर 440 रुपयांचे टार्गेट आणि 395 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा. ही कंपनी केमिकल आणि फार्मा इंडस्ट्रीजसाठी उपकरणं तयार करते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)