Bollywood Celeb IT Raid: अनुरागच्या घरातून फिल्मी स्टाईलमध्ये आयकर अधिकारी बाहेर, समोर आले फोटो
मधू मंटेना यांच्या मुंबईतील घरावरही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. मधू मंटेना यांची कंपनी क्वान टॅलेंट मॅनेजमेंटच्या अंधेरी येथील कॉमर्स सेंटरवरही आयकरच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. यानंतर क्वान कंपनीचे चार अकाऊंट्स सीज करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयकर विभागाने मुंबई, पुणे येथे 22 ठिकाणी छापेमारी केली. अनुराग कश्यपच्या फ्लॅटवरही छापा टाकण्यात आला. आयकर विभागाचं पथक फँटम फिल्मच्या कार्यालयातही गेलं होतं. आज देखील ही कारवाई सुरु राहू शकते.
टॅक्स चोरीच्या रकमेचं वाटप कसं झालं? यातून काय काय खरेदी करण्यात आलं किंवा मनी लॉण्ड्रिंगसाठी ही रक्कम परदेशात तर पाठवली गेली का? याची माहिती आयकर विभाग घेत आहे.
आयकर विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या छापेमारीत अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाईस आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
आयकर विभागाला माहिती मिळाली होती की फँटम सिनेमाच्या कमाईत टॅक्सची चोरी झाली होती. फँटम सिनेमात जो पैसा कमावला गेला त्याची योग्य माहिती देण्यात आलेली नाही.
टॅक्स चोरीच्या प्रकरणात आयकर विभागाने ही छापेमारी केली आहे. अनुराग कश्यप, तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल, मधू मंटेना आणि फँटम फिल्मशी संबंधित लोकांवर छापेमारी करण्यात आली आहे.
आयकर विभागाचे अधिकारी बाहेर पडत असताना गेटवर त्यांचे फोटो काढले जात होते. त्यावेळी त्यांनी फोटो काढण्यासही मनाई केली.
रात्रभर चौकशीनंतर आयकर विभागाचे अधिकारी अनुराग कश्यपच्या घरातून बाहेर पडले. अनुराग आणि तापसीची रात्रभर चौकशी करण्यात आली.
मुंबईत दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू , दिग्दर्शक विकास बहल आणि मधू मंटेना यांच्यावर आयकर विभागाने काल छापेमारी केली. रात्रभर ही छापेमारी सुरु होती. यादरम्यान तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप यांचीही चौकशी झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -