Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आपल्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या अभिनेत्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री
बॉलिवूडमध्ये काहीही शक्य आहे. या क्षेत्रात अशा बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वत: च्या वयाच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या वयाच्या कलाकारांच्या आईची भूमिका साकारली आहे. आश्चर्यचकित होऊ नका. होय असे बरेच चित्रपट आहेत ज्यात आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री ही अभिनेता मुलापेक्षा वयाने लहान होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनरगिस दत्त : दिग्गज अभिनेत्री नरगिसने मदर इंडिया (1957) चित्रपटात सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांच्या आईची भूमिका केली होती. त्यावेळी नरगिस 28 वर्षांची होती. त्यावेळी सुनील दत्त आणि राजेंद्र कुमारही 28 वर्षांचे होते, म्हणजेच तिघेही एकाच वयाचे होते. या चित्रपटानंतर नर्गिस आणि सुनील दत्तचे लग्न झाले.
वहीदा रेहमान : वहीदा रहमान यांनी अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका 'नमक हलाल' (1982) मध्ये केली होती. त्यावेळी ती बिग बीपेक्षा अवघ्या चार वर्षांनी मोठी होती. म्हणजेच त्याचे वय 44 वर्षे आणि बिग बी 40 वर्षांचे होते. साल 1976 मध्ये ‘अदालत’ या चित्रपटात वहीदाने अमिताभच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
रोहिणी हट्टंगडी : 'अग्निपथ' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारणारी रोहिणी हट्टंगडी बच्चन यांच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान होती. रोहिणी 39 आणि अमिताभ बच्चन 48 वर्षांचे होते.
रोहिणी यांनी दामिनी (1993) चित्रपटात ऋषी कपूरच्या आईची भूमिका देखील केली होती. त्यावेळी त्यांच्या वयात फक्त एक वर्षाचा फरक होता. रोहिणी 42 वर्षांची होती आणि ऋषी कपूर 41 वर्षांचे होते.
शेफाली शाह : 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या शेफाली यांनी त्याच चित्रपटात अक्षय कुमारच्या आईची भूमिका केली होती. अक्षय शेफाली यांच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्यावेळी शेफालीचे वय 33 होते, तर अक्षय 38 वर्षांचा होता.
रीमा लागू : 'वास्तव' या चित्रपटात 41 वर्षांच्या रीमा लागू यांनी स्वतःहून एका वर्षापेक्षा लहान असलेल्या संजय दत्तच्या आईची भूमिका साकारून सर्वांना चकित केले होते. त्यावेळी संजय 40 वर्षांचा होता आणि रीमा 41 वर्षांच्या होत्या.
सुप्रिया कर्णिक : 'यादें' चित्रपटात हृतिक रोशनच्या आईची भूमिका साकारणारी सुप्रिया कर्णिक हृतिक रोशनपेक्षा एक वर्षाने लहान आहे. त्यावेळी हृतिक 27 वर्षांचा होता आणि सुप्रिया 26 वर्षांची होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -