Kajal Agarwal Wedding : अभिनेत्री काजल अग्रवालच्या लग्नातील हे फोटो पाहिलेत का?
काजलने आपला बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत आपली लग्नगाठ बांधली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच काजल अग्रवालने साखरपुड्याला नेसलेली साडी प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केली होती.
2011 मध्ये तिने बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. सिंघममधून तिने अभिनेता अजय देवगणसोबत स्क्रिन शेअर केली. त्या चित्रपटानंतर काजलला 'सिंघम गर्ल' म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीमधील नावाजलेली अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला आपली लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दोघांनीही लग्नात केलेल्या फोटोशूटचे फोटो व्हायरल होत आहेत.
कोरोना काळात काजल-गौतमचा विवाहसोहळा सर्व अटी-शर्थींचं पालन करत पार पडला. वधू-वरासाठी डिझाइनर मास्कही तयार करण्यात आले होते.
काजल अग्रवालच्या लग्नसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये नववधू साजातील काजल आणि तिचा पती गौतम किचलू यादोघांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काजलचा जोडीदार गौतम किचलू इंटिरियर डिझाइनर आहे आणि त्याचं एक ऑनलाईन स्टोअर आहे.
35 वर्षीय अभिनेत्री काजल अग्रवालने बॉलिवूडमध्ये 'क्यों हो गया न' या चित्रपटामधून डेब्यू केला होता. या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती.
मुंबईतील एका हॉटेलमध्ये काजल अग्रवालचा शाही विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लग्नसोहळ्यासाठी फार कमी लोकं उपस्थित होते.
काजलच्या लग्नाचा लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनामिका खन्नाने डिझाइन केला होता.
नववधू काजल अग्रवालने क्लासी आउटफिट्समध्ये आपलं वेडिंग फोटोशूट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी काजलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर यासंदर्भात खुलासा केला. तिने सांगितलं की, मी बिजनेसमन गौतमची आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून निवड करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -