Birthday Special | अभिनेता रणवीर सिंहचा 35वा वाढदिवस; फोटोंमध्ये पाहा दीपवीरची लव्ह केमिस्ट्री
चित्रपट '83' मे महिन्यात रिलीज होणार होते. परंतु, लॉकडाऊनमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता हा चित्रपट याच वर्षी ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरणवीर सिंह आणि दीपिका दिग्दर्शक कबीर सिंह यांचा आगामी चित्रपट '83' मध्ये दोघेही स्क्रिनवर एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात रणवीर कपिल देव यांच्या भूमिकेत तर दीपिका पादुकोण रोमी भाटिया यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
रणवीर आणि दीपिकाने 'गोलियों की रासलीला : राम-लीला', 'बाजीराव-मस्तानी' आणि 'पद्मावत' या चित्रपटांमध्ये एकत्र काम करत होते. हे तिनही चित्रपट संजय लीला भन्साळी यांचे होते. या तिनही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.
रणवीर सिंह म्हणाला की, जेव्हा दीपिका दुसऱ्या ठिकाणी शुटिंग करायची. त्यावेळी तो त्या लोकेशनवर शॉर्ट ट्रिपसाठी जात असे. त्यावेळी त्याचे वडिल त्याला म्हणत असतं की, तू फुलांवर किती पैसे खर्च करतोयस याची तुला कल्पना आहे का? आणि रणवीर याचं उत्तर देताना म्हणत असे की, लक्ष्मीच्या अवतारात पुन्हा घरात येतील'
रणवीर सिंह बोलताना म्हणाला होता की, 'दीपिकासोबत सहा महिन्यांच्या रिलेशनशिपदरम्यान मला याच मुलीशी लग्न करायचं आहे, असं मनाशी पक्क केलं होतं. मला माहिती होतं. तिला फुलं प्रचंड आवडतात. विशेषतः तिला लीली फार आवडतात.'
रणवीर सिंह चॅटदरम्यान हेदेखील म्हणाला होता की, दीपिकाला सहा महिने डेट केल्यानंतरच लग्नासाठी विचारलं होतं. दीपिकासाठी फुल खरेदी करण्यासाठी तो सर्वाधिक पैसे खर्च करत होता. त्यामुळे त्याचा वडिलांनाही रणवीरची काळजी वाटत होती.
रणवीर म्हणतो की, जर दीपिकाने त्याला सपोर्ट केला नसता तर, तो एवढा मोठा स्टार कधीच होऊ शकला नसता. फुबॉल प्लेयर सुनील छेत्रीसोबत इंस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये रणवीर सिंह म्हणाला होता की, दीपिकाच्या मदतीमुळेच त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली होती.
रणवीर दीपिकावर खूप प्रेम करतो. तो अनेकदा आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावरही देत असतो. रणवीरने आपल्या एका इंटव्ह्यूमध्ये बोलताना सांगितले होते की, 'त्याला दीपिकाप्रमाणेच लाईफ पार्टनर पाहिजे होती. तसेच दीपिकावर आपलं जीवापाड प्रेम असल्याचंही त्यावेळी त्याने सांगितलं होतं.
रणवीर आणि दीपिका नोव्हेंबरमध्ये 2018 मध्ये इटली येथे आपली लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. याचसोबत सोश मीडियावर दीपवीर हा हॅशटॅगही ट्रेंड होत होता.
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात रोमॅन्टिक कपल्सपैकी एक आहे. दीपवीर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी असून दोघांमध्ये केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळते.
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'गोलियों की रासलीला : रामलीला'च्या शुटींगदरम्यान रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण एकमेकांच्या प्रेमात पडले. 2018मध्ये त्यांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचा आज 35वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्ता आज रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांचे काही फोटो तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हे फोटो पाहून हे कपल बॉलिवूडमधील परफेक्ट कपल का आहे, हे जाणून घेण्यास मदत होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -