Bird Flu: केरळमध्ये कोंबड्या व बदके मारण्यास सुरूवात, सहा राज्यात अलर्ट, फोटो पाहा
देश एकीकडे कोरोनाशी झुंज देत आहे तर दुसरीकडे बर्ड फ्लूने सहा राज्यांमध्ये कहर केला आहे. त्याची सुरुवात राजस्थानमध्ये झाली. आता तो मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, केरळ आणि हरियाणानंतर गुजरातमध्येही पोहोचला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केरळमधील कोट्टायममधील नींदूरमध्ये बर्ड फ्लूने मृत्यू झालेल्या बदकांना पुरण्यात येत आहे. कोट्टायम आणि आलाप्पुझा जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 40 हजार पक्ष्यांना एकाचवेळी मारण्याचा आदेश दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे चित्र जयपूरमधील जल महल जवळचे आहे. वनविभागाचे अधिकारी रस्त्याच्या कडेला आजारी कावळ्याला पकडत आहेत. राजस्थानमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक कावळे मरण पावले आहेत. बर्ड फ्लूने राजस्थानातील सवाई माधोपूर, बिकानेर, झालावाड़, बारां, पाली आणि बनसवारा या सहा जिल्ह्यांमध्ये शिरकाव केला आहे.
हे चित्र केरळमधील अलाप्पुझाचे आहे. केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यात पशुपालक विभागाच्या कर्मचार्यांनी चार ठिकाणी एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H5N8) शोधल्यानंतर त्या बदकांना जाळले. केरळमधील पक्ष्यांच्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यावर शेजारच्या कर्नाटक आणि तामिळनाडूने पाळत ठेवली असून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केरळमध्ये फ्लूमुळे सुमारे 1700 बदकांचा मृत्यू झाला आहे.
केरळमधील अलाप्पुझा आणि कोट्टयम या बाधित भागाच्या एक किलोमीटरच्या भागात पक्ष्यांना मारण्याची मोहीम सुरू करण्यात आली. दोन्ही जिल्ह्यांमधून भोपाळ प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाल्यानंतर एक दिवसानंतर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. अलाप्पुझा जिल्हा प्रशासनाने सांगितले की, नेदुमुडी, तकाजी, पल्लीपाड आणि करुवत्त येथील कुट्टनाड भागातील चार पंचायतमध्ये ही मोहीम बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ करुवत्त पंचायत क्षेत्रात सुमारे 12,000 पक्षी मारले गेले आहेत.
राजस्थानमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की कोटा आणि बारां जिल्ह्यात पक्ष्यांच्या नमुन्यांच्या चाचण्यांमध्येही एव्हीयन इन्फ्लूएंझा आढळला आहे. राज्याचे कृषी व पशुसंवर्धन विभाग मंत्री लालचंद कटारिया म्हणाले की, झालावाड, कोटा आणि बारां या तीन जिल्ह्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) संसर्ग झाला आहे आणि इतर ठिकाणीही हा विषाणू पसरत आहे, ही चिंताजनक बाब आहे.
मंगळवारी पहाटेपर्यंत राजस्थानातील 33 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या 625 वर पोहोचली. तर 11 जिल्ह्यातील 86 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हे चित्र जम्मू-काश्मीरचे आहे. जम्मू-काश्मीरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पशुसंवर्धन आणि वन्यजीव विभागाच्या संयुक्त पथकांनी मंगळवारी जम्मूच्या आरएसपुरा सेक्टरमधील घराना वेटलँड (वेटलँड) येथे भेट दिली आणि तपासणीसाठी 25 पक्ष्यांचे नमुने गोळा केले. कोणताही पक्षी घातक विषाणूचा धोका आहे का?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -