राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली, चौकाचौकात रोषणाई

या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे येथील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे. (फोटो : एएनआय)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अयोध्येतील राममंदिर भूमिपूजनाला उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या यादीत काही बदल करण्यात आले आहे. सुरुवातीला तयार करण्यात आलेल्या यादीत 200 नावांचा समावेश होता. आता यादीतील 30 नावं कमी करण्यात आली आहेत. आता 170 जणांनी नवी यादी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संपूर्ण शहरात प्रभू श्री राम यांच्या जीवनाशी संबंधित कला तयार करण्यात आल्या आहेत, तर अनेक ठिकाणी चित्रही काढण्यात आली आहे. मोठे शहरातील मोठे पूल, उद्याने आणि बऱ्याचं महत्त्वाच्या ठिकाणांची दुरुस्ती करण्यात आली आहे. (फोटो : एएनआय)
देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीचे काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. ऐतिहासिक राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला होणार आहे. संपूर्ण भारताचे या दिवसाकडे लक्ष लागले आहे. (फोटो : एएनआय)
राममंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरीला सजवण्यास सुरुवात झाली आहे. अयोध्येतील चौकाचौकात रोषणाई करण्यात आली आहे.
अयोध्या नगरीला अशा प्रकारे सजवण्यात येत आहे की 5 ऑगस्टला त्याची भव्यात वेगळी दिसेल. (फोटो : एएनआय)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -