Vastu Tips : दाराच्या मागे कपडे लटकवताय? तर वेळीच थांबा; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...
घरात येताच तुम्ही कपडे काढून इथे-तिथे ठेवत असाल किंवा दाराच्या मागे लटकवत असाल तर आताच सावध व्हा. वास्तुशास्त्रामध्ये घरातील काही गोष्टींचं स्थान सांगण्यात आलं आहे, ज्याचा अवलंब केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा नांदते आणि यापैकी एक म्हणजे कपडे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपले कपडे आपण चुकीच्या जागी काढून ठेवले तर जीवनातील अडचणी कधीच संपत नाहीत. घराची वास्तू योग्य असेल, तरच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते.
वास्तुशास्त्रानुसार, घरात येताच कपडे योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो. वास्तूशास्त्रात कपडे ठेवण्याचं योग्य स्थान सांगण्यात आलं आहे.
वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात रोज कलह होतो. आर्थिक अडचणी, करिअरमधील अडथळे, आजार तुमची पाठ सोडत नाहीत. काही ना काही समस्या घरात कायम राहतात, त्यामुळे घरात कपडे योग्य ठिकाणी काढून ठेवणं महत्त्वाचं आहे.
दरवाजाच्या मागे कपडे चुकूनही लटकवू नये. पण यामागे नेमकं कारण काय? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, दरवाजाच्या वरच्या भागात धनाची देवी लक्ष्मीचं स्थान आहे, त्यामुळे दरवाजाच्या मागे कपडे लटकवू नये असं सांगण्यात येतं. असं लक्ष्मीचा अनादर होतो आणि तिचा कोप होतो.
दरवाजामागे कपडे लटकवल्याने आर्थिक स्थिती बिघडते. असं केल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे घरात चुकूनही दाराच्या मागे कपडे लटकवू नये.
दारामागे कपडे लटकवल्याने नातेसंबंध बिघडतात. नात्यात दुरावा, अनावश्यक कलह आणि वाद वाढतात.
दरवाजाच्या मागे कपडे लटकवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा येतो. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात.
यासोबतच कोणत्याही कामात परिश्रम करूनही यश मिळण्याची शक्यता कमी होते आणि प्रत्येक कामात काही ना काही अडथळे येऊ लागतात.