Valmiki Jayanti 2022 : आज महर्षि वाल्मिकी जयंती, जाणून घ्या खास गोष्टी
महर्षी वाल्मिकी यांची जयंती दरवर्षी अश्विन महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज 09 ऑक्टोबर 2022 रोजी वाल्मिकी जयंती आहे.
हिंदू धर्मातील महत्त्वाचे महाकाव्य रामायण महर्षी वाल्मिकी यांनी रचले होते.
वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले रामायण सर्वात जुने मानले जाते.
काही मान्यतेनुसार, महर्षि कश्यप आणि अदिती यांचा नववा मुलगा वरुण आणि त्याची पत्नी चारशनीच्या पोटी त्यांचा जन्म झाला.
असे म्हणतात की, जन्मानंतर त्यांना भिल्ल समाजातील लोकांनी बालपणीच पळवून नेले, त्यानंतर ते भिल्ल समाजात वाढले आणि नंतर त्यांचे नाव ‘वाल्या’ पडले
सर्व लोक त्यांना ‘वाल्या कोळी’ म्हणू लागले. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तो लोकांना लुटायचा.
मान्यतेनुसार, एकदा वाल्मीकीजी तपश्चर्येला बसले होते. बराच वेळ चाललेल्या या तपस्यामध्ये तो इतका तल्लीन झाले होते की त्याच्या संपूर्ण शरीराला वाळवी लागली.
पण त्यांनी तपश्चर्येत भंग न आणू घेता अध्यात्मिक साधना सुरू ठेवली. असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी वाळवी आपले घर बनवते त्याला वाल्मिकी म्हणतात
म्हणून ते वाल्मिकी म्हणून ओळखले जाऊ लागले.
यावर्षी पौर्णिमा तिथी 09 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:40 वाजता सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:24 वाजता समाप्त होईल.