Shani Gochar 2025 : फेब्रुवारी महिन्याच्या 'या' दिवशी शनी बदलणार चाल; 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरु

शनीचं राशी किंवा नक्षत्र परिवर्तन राशींसाठी फार महत्त्वाचं आहे. फेब्रुवारी महिन्यात शनीचं नक्षत्र संक्रमण होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शनीचं नक्षत्र परिवर्तन 2 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे. या दिवशी सकाळी 08.51 मिनिटांनी शनी पूर्व भाद्रपदाच्या प्रथम स्थानापासून द्वितीय चरणात संक्रमण करणार आहे. पूर्व भाद्रपद नक्षत्राचा स्वामी बृहस्पती ग्रह हा भाग्याचा कारक ग्रह आहे.

वसंत पंचमीला शनीचं नक्षत्र संक्रमण होणं मकर, कर्क आणि मिथुन राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या काळात तुमची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होतील.
शनीचं नक्षत्र संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तसेच,पैशांच्या बाबतीत मानसिक समस्या दूर होतील.
या काळात कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल. धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. तसेच, साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी होईल.
वसंत पंचमीपासून शनी देवाची कर्क राशीवर कृपा असणार आहे. पूर्व भाद्रपदातील शनीचं संक्रमण कर्क राशीच्या नोकरीत चांगले योग घडवून आणणार आहे. या काळात तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकता.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. जोडीदाराबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)