Shani Gochar 2025 : 29 जानेवारीपासून 3 राशींना सोन्याचे दिवस, शनि बनवणार शक्तिशाली राजयोग, बँक बॅलन्समध्ये होणार घसघशीत वाढ

शनीला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. याच शनीचा ऐन अमावस्येच्या मुहूर्तावर बुधाशी संयोग होत आहे, ज्यातून शुभ असा अर्धकेंद्र योग निर्माण होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
हा योग काही राशींसाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. शनीची या राशींवर विशेष कृपा असणार आहे.

वैदिक पंचांगानुसार, 29 जानेवारीला दुपारी 3 वाजून 58 मिनिटांनी शनि आणि बुध एकमेकांपासून 45 अंशांवर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल.
सध्या शनि कुंभ राशीत आहे, तर बुध मकर राशीत आहे. दोघांच्या या स्थितीमुळे अर्धकेंद्र योग निर्माण होत आहे. या योगामुळे अनेक राशींचं भाग्य उजळू शकतं. या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कर्क राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप लाभदायी ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकतं. बुधाचे मकर राशीत भ्रमण व्यवसायासाठी लाभदायक ठरू शकतं. तुम्ही केलेली रणनीती यशस्वी ठरू शकते.
परदेशी कंपनीच्या माध्यमातूनही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही जोडीदारासोबत परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. या काळात तुमचं आरोग्य चांगलं राहील.
मेष राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप फायद्याचा ठरेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांच्या भौतिक इच्छा पूर्ण होऊ शकतात. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी तुमची लोकप्रियता झपाट्याने वाढणार आहे, तुमचं नाव होणार आहे.
व्यवसाय करणाऱ्यांन नवीन प्रोजेक्ट, ऑर्डर किंवा नवीन डील मिळू शकते. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. अविवाहित लोक त्यांच्या आवडीनुसार जोडीदार शोधू शकतात. विद्यार्थ्यांनाही या काळात खूप फायदा होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांसाठी अर्ध केंद्र योग खूप भाग्याचा ठरेल. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांचं करिअर खूप चांगलं चालणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात.
मकर राशीच्या लोकांच्या सुख-सुविधांमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. बुध आणि शनीच्या कृपेमुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. परंतु तुम्ही पैसे वाचवण्यात अयशस्वी होऊ शकता. या काळात उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील.