Mangal Gochar 2025 : तब्बल 50 वर्षांनंतर मंगळाचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश; 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह संपत्तीत घसघशीत वाढ
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळानंतर राशी आणि नक्षत्र बदलत राहतात, ज्याचा परिणाम देश आणि जगासह मानवी जीवनावर दिसून येतो. त्यातल्या त्यात, मंगळ हा कडक ग्रह मानला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंगळाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. त्यात 12 एप्रिल 2025 रोजी मंगळ शनीच्या नक्षत्रात प्रवेश करेल.
12 एप्रिलला सकाळी 6.32 वाजता मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल आणि मंगळ-पुष्य योग तयार होईल. मंगळाच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे काही राशींचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.
या राशींची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
कन्या रास : मंगळाचा नक्षत्र बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. नोकरीशी संबंधित नवीन संधीही मिळतील. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.
या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल. तसेच नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्या करिअरला नवीन उंचीवर नेतील. विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील.
मंगळाचा शनीच्या राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचा मान-सन्मान वाढेल. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. एकंदरीत काळ सर्वच बाबतीत अद्भूत असेल.
व्यावसायिकांना प्रलंबित रक्कम मिळू शकते. तसेच, यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यापारी नवीन ऑर्डरमधून चांगला नफा कमवू शकतात. तुम्हाला मोठी व्यावसायिक डील मिळू शकते, ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो.
मीन राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अनुकूल ठरू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्हाला नोकरीत सन्मान आणि भरपूर संपत्तीही मिळेल. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळेल आणि फालतू खर्च कमी होईल.
या काळात नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे आणि तुमची संपत्ती वाढेल. तुमच्या जीवनात सुखसोयी वाढतील. यावेळी तुम्ही लक्झरी वाहन किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांनास्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते.