Astrology : ऑफिसमध्ये काम तुमचं पण क्रेडिट दुसऱ्याला असं होतं का? तुमची कुंडली नेमकं काय सांगते??
ज्योतिष शास्त्रात ग्रहांची भूमिका आणि आपल्या जीवनावर पडणारा त्याचा चांगला-वाईट परिणाम याविषयी सांगण्यात आलं आहे. आपलं वैयक्तिक जीवन, आरोग्य, धन-संपत्तीपासून ते तुमच्या नोकरी-व्यवसायापर्यंत ग्रहांची भूमिका ही सर्वात महत्ताची असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही नोकरी करत असाल आणि ऑफिसमध्ये सतत तणावात असाल तर तुमच्या कुंडलीतील काही कमजोर ग्रहांच्या स्थितीवर लक्ष देण्याची गरज आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, अथक परिश्रम करुनसुद्धा तुमच्या कामाचं क्रेडिट दुसऱ्याच व्यक्तीला मिळत असेल किंवा कामाच्या ठिकाणी सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसेल तर याचा अर्थ तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळ ग्रहांची स्थिती नाजूक आहे असं मानतात.
सूर्याला ग्रहांचा राजा म्हणतात. जर तुमच्या कुंडलीत सूर्याची स्थिती कमजोर असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही मेहनत करुनही तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही.
तुमच्या कुंडलीतील सूर्य ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही काही ज्योतिषीय उपाय करु शकता. जसे की, रविवारी मीठ आणि मांसाहारी पदार्थ खाणं बंद करा. सूर्यदेवाला जल अर्पण करा, सूर्य मंत्राचा जप करा तसेच, काही वस्तूंचं दान करा.
ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाला साहस आणि ऊर्जेचं प्रतीक मानले जाते. कुंडलीत जर मंगळ ग्रह कमजोर असेल तर साहस आणि ऊर्जा कमी होते. याचा तुमच्या कामावरही परिणाम होऊ शकतो.
जर तुम्हाला मंगळ ग्रह मजबूत करायचा असेल तर लाल रंगाच्या वस्तू दान करा. मंगळवारच्या दिवशी उपवास करा. हनुमान चालीसाचं पठण करा.
जेव्हा व्यक्तीला आपल्या कामाचं क्रेडिट मिळत नसेल तर अशा वेळी राहु-केतु ग्रहांची भूमिका महत्त्वाची असते. राहु-केतु ग्रह जर कमजोर असेल तर मेहनतीचं फळदेखील मिळत नाही. अशा वेळी गणेशाची पूजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)