Hartalika 2024 : आज हरितालिकेच्या दिवशी 'या' वस्तूंचं करा दान; पतीचं प्रेम वाढेल, वैवाहिक जीवनातही येईल गोडवा
हरितालिकेचा शुभ दिवस आज देशभरात साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या दिनाचं फार महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया खास दिवशी महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना करतात.
या दिवशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचं दान करणं फार शुभ मानलं जातं. हरितालिकेच्या दिवशी महिलांनी व्रताबरोबरच काही गोष्टींचं दान करणं महत्त्व आहे.
या दिवशी महिलांनी दानात मेहंदी, टिकल्या, बांगड्या, कुंकू, कलश, काजळ, कंगवा, चंदन यांसारख्या श्रंगारिक वस्तूंचं दान करणं फार शुभ मानलं जातं.
हरितालिकेच्या दिवशी या सर्व वस्तूंचं दान केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेमभाव वाढतो.तसेच, दोघांमधील नातं अधिक मजबूत होतं. त्याचबरोबर दाम्पत्य जीवन सुखी राहते.
असे केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांची सदैव कृपा राहते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)