Ganesh Chaturthi 2024: गणरायाला प्रिय 'या' राशी; नेहमीच असते बाप्पाची कृपादृष्टी, सर्व पिडा, दुःख दूर करतील
गणरायाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये त्याच्या आवडत्या राशींबाबतही सांगण्यात आलं आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्याही काही प्रिय राशी आहेत. याबाबत ज्योतिष शास्त्र सविस्तर सांगण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपल्या प्रिय राशींवर बाप्पाची नेहमी कृपादृष्टी असते. या राशींच्या आयुष्यातील पिडा, दुःख आणि संकटं हरण्यासाठी बाप्पा धावून येतो, असं म्हणतात.
श्री गणेशाला हिंदू धर्मातील पहिलं पूज्य दैवत मानलं जातं. म्हणूनच कोणतंही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणरायाची मनोभावे पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यात गणपतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कारण, याच महिन्यात गणपतीचा जन्म झाला.
भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. पौराणिक कथा आणि मान्यतांनुसार, या तिथीला शिवपुत्र भगवान गणेशाचा जन्म झाला होता.
यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी होणार असून 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थदशी असून या दिवशी बाप्पा आपल्या गावी परतणार आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून, मनोभावे पूजाअर्चा करून नंतर बाप्पाला निरोप दिला जातो.
गणरायाची आपल्या भक्तांवर नेहमीच कृपादृष्टी असते. भक्तांची दुःख हरण्यासाठी गणराय नेहमीच धावून येतो. पण अशा काही राशी आहेत, द्या बाप्पाला खूप प्रिय आहेत आणि म्हणूनच या राशींवर बाप्पा नेहमीच खूश असतो. या राशींवर बाप्पाचा नेहमीच वरदहस्त असतो, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
मेष रास (Mesh Rashi) : मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे ते शूर, धैर्यवान आणि प्रत्येक कामात निपुण असतात. याशिवाय, ही भगवान गणेशाची आवडती राशी आहे, ज्यामुळे मेष राशीचे लोक देखील बुद्धिमान असतात. बाप्पाच्या कृपेनं त्यांना भरपूर यश मिळतं.
मिथुन रास (Mithun Rashi): मिथुन ही गणपतीची आवडती रास आहे, ज्यांच्यावर बाप्पाची कायम कृपादृष्टी असते. श्रीगणेशाच्या कृपेनं त्यांना मान-सन्मान मिळतो आणि धन-धान्याची कमतरता नसते.
मकर रास (Makar Rashi): रीगणेशाच्या कृपेनं मकर राशीचे लोक संकटांपासून दूर राहतात आणि प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. त्यांना विशेषत: व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात विशेष लाभ मिळतो.