Gajanan Maharaj Prakat Din : "गण गण गणात बोते"! संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शेगाव नगरी दुमदुमली
Gajanan Maharaj Prakat Din : गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतेय.
संत गजाजन महाराज प्रकट दिन
1/7
श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन दरवर्षी माघ वद्य सप्तमीला साजरा करण्यात येतो. त्यानुसार आज महाराजांचा 147 वा प्रकट दिन आहे.
2/7
खरंतर संत गजानन महाराजांचा जन्म कधी आणि कुठे झाला हे जरी अज्ञात असलं तरी संत गजानन महाराज हे 23 फेब्रुवारी 1878 अर्थात माघ वद्य सप्तमीला शेगाव येथे भक्तांना पहिल्यांदा दिसले.
3/7
तो दिवस गुरुवारचा होता. आणि तेव्हा पासून संत गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येतो.
4/7
गुरुवारी येणारा प्रकट दिन शुभ मानला जात असल्याने आज शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतेय.
5/7
सकाळपासूनच पहिली आरती झाल्यानंतर दिवसभरातील धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होत असते. तर दुपारी नगर परिक्रमा होत असते.
6/7
आज देशभरातून भाविक "गण गण गणात बोते " च्या गजरात शेगावात दाखल झाले आहेत.
7/7
संपूर्ण शेगाव हे भक्तीने न्हाऊन निघालं असून भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय.
Published at : 20 Feb 2025 09:15 AM (IST)