Astrology : 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा... नाराज होईल देवी लक्ष्मी
Astrology : लक्ष्मी देवी सहजासहजी कोणावरही प्रसन्न होत नाही. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

Astrology
1/7
हिंदू संस्कृतीत लक्ष्मी देवीचं खूप महत्व असून सुख-समृद्धी आणि धन वृद्धीसाठी लक्ष्मीची पूजा केली जाते.
2/7
मात्र, लक्ष्मी देवी सहजासहजी कोणावरही प्रसन्न होत नाही. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात लक्ष्मी देवीची कृपा मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे.
3/7
लक्ष्मी देवीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात नेहमी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे.
4/7
याबरोबरच जर तुमच्या घरात शांतता, प्रेम आणि सकारात्मकता असेल तरच लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्या घरात भांडणं, तंटा आणि सतत वादविवाद होत असतील अशा घरांमध्ये लक्ष्मी देवी कधीच प्रवेश करत नाही.
5/7
ज्या घरांमध्ये नियमितपणे देवांची मनोभावे पूजा केली जाते. अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यानं लक्ष्मी प्रसन्न होऊन तेथे प्रवेश करते. तसेच ज्या घरात कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाहीत अशा ठिकाणी लक्ष्मी देवीच आगमन होत नाही.
6/7
धार्मिक मान्यतेनुसार जिथे घराचा प्रवेशद्वार स्वच्छ आणि सुशोभित असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. लक्ष्मी देवीला स्वच्छता प्रिय असल्यानं अशा ठिकाणी लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन प्रवेश करते.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Mar 2026 07:04 AM (IST)