SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI: भारतीय स्टेट बँकेच्या शेअरमधील घसरण सुरुच आहे. स्टेट बँकेचं बाजारमूल्य 10 लाख कोटी रुपयांच्या आत आलं आहे. एका दिवसात बँकेचं बाजारमूल्य 30 हजार कोटींनी कमी झालं.
Continues below advertisement
स्टेट बँकेच्या शेअरमध्ये घसरण कायम
Continues below advertisement
1/6
मुंबई : भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण सुरुच आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये 13 मार्चला 3 टक्क्यांची घसरण होऊन शेअर 1052.60 रुपयांवर पोहोचला आहे.
2/6
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरनं चार आठवड्यांचा निचांक गठला आहे. यामुळं कंपनीचं बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत आलं आहे. एसबीआयच्या शेअरमध्ये झालेल्य घसरणीनं बाजारमूल्य 30090 कोटी रुपयांनी कमी होऊन 971549 लाख कोटी झालं आहे.
3/6
स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर 12 मार्चला 1085.20 रुपयांवर होता. काल एसबीआयचं बाजारमूल्य 10 लाख 1 हजार 639 कोटी होतं. स्टेट बँकेच्या बाजारमूल्याचा उच्चांक 11 लाख 39 हजार 628 कोटी रुपये होतं.त्यानंतर एसबीआयच्या शेअरमध्ये घसरण सुरु झाली आहे. उच्चांकाच्या तुलनेत एसबीआयचं बाजारमूल्य 1 लाख 68 हजार 79 कोटी रुपयांनी कमी झालं आहे.
4/6
स्टेट बँकेच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळं रिटेल गुंतवणूकदारांचं नुकसान झालं आहे. त्यानुसार एलआयसीचं देखील नुकसान होत आहे. कारणं, एलआयसीची स्टेट बँक ऑफ इंडियात 9.23 टक्के गुंतवणूक आहे. एलआयसी ही एसबीआयची सर्वात मोठी संस्थात्मक गुंतवणूकदार संस्था आहे.
5/6
एसबीआयच्या शेअरमध्ये मार्च महिन्यात 12 टक्क्यांची घसरण झाली आहे. मार्च 2020 नंतरची ही मोठी घसरण झाली आहे. त्यावेळी एसबीआयचा शेअर 35 टक्क्यांनी घसरला होता. मार्च 2025 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान एक महिना सोडता इतर 11 महिन्यात एसबीआयच्या शेअरमध्ये तेजी होती. अकरा महिन्यांमधील तेजीमुळं बाजारमूल्य 11 लाख कोटींपर्यंत पोहोचलं होतं.
Continues below advertisement
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 13 Mar 2026 07:03 PM (IST)
= 6">