Astro Tips : पूजा करताना अचानक रडू आलं तर...? जाणून घ्या याचा अर्थ
देवाच्या भक्तीशी एकरुप होणं आणि सर्व दु:खापासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजेच देवाची भक्ती, पूजाअर्चा करणे. अनेकांच्या जीवनाचा आधारच भक्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवाच्या भक्ती आणि प्रेमापोटी अनेकदा पूजा करताना आपले डोळे पाणावतात. आपल्यापैकी अनेकांना पूजा करताना डोळ्यांत आपोआप पाणी येतं.
आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना पूजा करताना डोळ्यांत पाणी येतं, काहींना झोप येते, काही जांभई देतात तर काहींना शिंका सुरु होतात. या सर्व गोष्टींचा काहीतरी संकेत असतो.
खरंतर, पूजेच्या वेळी डोळ्यांत पाणी येत असेल तर हा एक शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमचं मन निर्मळ आहे. स्वच्छ आहे. आणि तुम्ही निस्वार्थी भावनेने देवाची भक्ती करताय असा आहे.
पूजेच्या दरम्यान रडू येण्याचं आणखी एक कारण म्हणजे तुम्ही ज्या भावनेने पूजा करताय ती ईश्वरापर्यंत पोहोचतेय असाही आहे.
तसेच, याचा तिसरा अर्थ म्हणजे तुमच्यामध्ये जे काही अवगुण होते तुम्ही त्यापासून मुक्त होत आहात आणि तुमचं मन स्वच्छ आणि पवित्र होतंय असा आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)